प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना पत्र

सोलापूर, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रणिती शिंदेंना आणि भाजपाकडून राम सातपुतेंना उमेदवारी मिळाली आहे. सातपुतेंना उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रणिती शिंदेंची उमेवारी जाहीर झाली होती. याच कारणामुळे सातपुतेंच्या नावाची घोषणा भाजपाने केल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उद्देशून एक पत्र लिहिले आणि ते समाजमाध्यमातून प्रसिद्ध केले आहे. या पत्राद्वारे प्रणिती […]

प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना पत्र

सोलापूर, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून प्रणिती शिंदेंना आणि भाजपाकडून राम सातपुतेंना उमेदवारी मिळाली आहे. सातपुतेंना उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रणिती शिंदेंची उमेवारी जाहीर झाली होती. याच कारणामुळे सातपुतेंच्या नावाची घोषणा भाजपाने केल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना उद्देशून एक पत्र लिहिले आणि ते समाजमाध्यमातून प्रसिद्ध केले आहे. या पत्राद्वारे प्रणिती शिंदे यांनी निवडणूक रिंगणात उतरलेल्या राम सातपुते यांचे स्वागत केले आणि त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. मतदारांच्या प्रश्नांवर दोघेही एकमेकांविरुद्ध उभे राहू असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. या पत्रावर उत्तरादाखल राम सातपुते यांच्या समर्थकाने ट्वीट केले. हे ट्वीट करताना समर्थकाने प्रणिती शिंदे आणि राम सातपुते या दोघांनाही ट्विटरवर टॅग केले. ट्विटरवरील हे ट्वीट राम सातपुते यांनी रीट्वीट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number