मुंबई, २५ मार्च २०२४, प्रतिनिधी : मातोश्री बंगल्यावर शिउबाठा आणि राशपची बैठक सुरू आहे. जागा वाटपाच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा सुरू आहे. मंगळवारी किमान १५ ते १६ जागांवरील उमेदवार जाहीर करू, असे सूतोवाच शिउबाठाचे संजय राऊत म्हणाले. त्यांनी आंबेडकर सोबत नसले तरी मविआ विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने चार जागांची मागणी केली आहे. हा प्रस्ताव आला आहे पण त्यावर निर्णय झालेला नाही, असेही संजय राऊत म्हणाले.