काँग्रेसच्या उमेदवारीमुळे वाड्यावर कुरबुरी

मुंबई, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : शाहू छत्रपती महाराज यांना काँग्रेसकडून २१ मार्च रोजी उमेदवारी जाहीर झाली. महाराजांच्या अभिनंदनासाठी तब्बल ४४ तासांनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट केले. यामुळे काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली तरी वाड्यावरच्या कुरबुरी काही संपलेल्या नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मविआचे नेते शाहू महाराजांच्या अभिनंदनसाठी कोल्हापूरच्या वाड्यावर आले […]

काँग्रेसच्या उमेदवारीमुळे वाड्यावर कुरबुरी

मुंबई, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : शाहू छत्रपती महाराज यांना काँग्रेसकडून २१ मार्च रोजी उमेदवारी जाहीर झाली. महाराजांच्या अभिनंदनासाठी तब्बल ४४ तासांनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट केले. यामुळे काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली तरी वाड्यावरच्या कुरबुरी काही संपलेल्या नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मविआचे नेते शाहू महाराजांच्या अभिनंदनसाठी कोल्हापूरच्या वाड्यावर आले होते. पण मविआचे नेते वाड्यावर असताना संभाजीराजे अनुपस्थित होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेर २३ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट केले. या ट्वीटद्वारे संभाजीराजे छत्रपती यांनी शाहू छत्रपती महाराज यांचे अभिनंदन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number