पाटबंधारेच्या कारवाईमुळे सील केलेला कृष्णा योजनेचा पाणीपुरवठा सुरू

इचलकरंजी, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी: सांगलीच्या पाटबंधारे विभागाने इचलकरंजी महापालिकेचे मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील पाणी उपसा केंद्र १४ कोटी रुपयांच्या थकबाकीवरून सील केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे तातडीचे पत्र जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठविण्यात […]

पाटबंधारेच्या कारवाईमुळे सील केलेला कृष्णा योजनेचा पाणीपुरवठा सुरू

इचलकरंजी, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी: सांगलीच्या पाटबंधारे विभागाने इचलकरंजी महापालिकेचे मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील पाणी उपसा केंद्र १४ कोटी रुपयांच्या थकबाकीवरून सील केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे तातडीचे पत्र जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता सील काढण्यात आले आणि पाणीपुरवठा सुरू झाला.

शहराला कृष्णा नदीवरील मजरेवाडी उपसा केंद्रातून ४५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. या उपशापोटी १४ कोटी ६० लाख ५९ हजार ८३३ रुपयांची मागणी सांगली पाटबंधारे विभागाने महापालिकेला केली आहे. मात्र, अकरा कोटी इतकीच रक्कम देणे असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यापैकी ७ कोटी २५ लाख रुपये महापालिकेने पाटबंधारे विभागाला भरले आहेत. तसेच १ कोटी ४१ लाख रुपयांची बॅँक गॅरंटीही पाटबंधारेकडे आहे.

असे असताना कोणतीही नोटीस न देता गुरुवारी (दि.२१) सायंकाळी साडेपाच वाजता नृसिंहवाडी विभागाचे शाखाधिकारी आर.सी. दानोळे यांनी मजरेवाडी येथील उपसा केंद्रातील पॅनल बोर्ड, विद्युत संच व मीटरला सील ठोकले. सील तोडल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा येऊन पाहणीही केली.

पाटबंधारे खात्याचे उपअभियंता यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची २० मार्चला भेट घेतली होती. महापालिकेची घरफाळा वसुली सुरू असून, शेवटच्या आठवड्यात जास्तीत जास्त रक्कम भरण्यात येईल, असे सांगितले होते. तरीही पाटबंधारे विभागाने धडक कारवाई केल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यापोटी शुक्रवारी २८ लाख ३१ हजार ५५८ रुपयांचा धनादेश पाटबंधारे विभागाला पाठविण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू झाला. तब्बल २२ तास शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number