नवी दिल्ली, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. होळीआधी भाजपाच्या राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत भाजपाने लोकसभेसाठी महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पुढील यादी होळीआधी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी २५ जागांवर भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. यामुळे यंदा भाजपा किमान २५ जागा निश्चित लढवणार असे सूत्रांचे म्हणणे आहे.