सांगली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाने काँग्रेसला डिवचले. सांगलीतून लोकसभेचा उमेदवार जाहीर करून उद्धव यांनी काँग्रेसला आव्हान दिले. यामुळे काँग्रेस अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातून शिउबाठाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव यांनी सांगलीत सभा घेऊन ही उमेदवारी जाहीर केली. याआधी सांगलीची जागा काँग्रेस लढवणार अशी चर्चा होती. पण काँग्रेसची यादी जाहीर होण्याआधीच उद्धव यांनी सांगलीतून लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केला. सांगली आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे कुस्तीच्या स्पर्धांसाठी प्रसिद्ध आहेत. या वातावरणाचा चंद्रहार यांना निवडणुकीत लाभ होण्याची शक्यता आहे.