अडचणीत सापडलेल्या काँग्रेसचा थयथयाट

नवी दिल्ली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर टीका करण्यात आली. निवडणूक रोख्यांमधून भाजपाला सर्वाधिक लाभ झाला असेही काँग्रेसने सांगितले. पण काँग्रेस पक्षाला कोणकोणत्या कंपन्यांनी निवडणूक रोखे दिले हे जाहीर करणे टाळण्यात आले. पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभा खासदार सोनिया गांधी, लोकसभा खासदार राहुल गांधी, खजिनदार अजय माकन […]

अडचणीत सापडलेल्या काँग्रेसचा थयथयाट

नवी दिल्ली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर टीका करण्यात आली. निवडणूक रोख्यांमधून भाजपाला सर्वाधिक लाभ झाला असेही काँग्रेसने सांगितले. पण काँग्रेस पक्षाला कोणकोणत्या कंपन्यांनी निवडणूक रोखे दिले हे जाहीर करणे टाळण्यात आले. पत्रकार परिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभा खासदार सोनिया गांधी, लोकसभा खासदार राहुल गांधी, खजिनदार अजय माकन आणि जयराम रमेश उपस्थित होते.

बँक खात्यातील विशिष्ट आर्थिक व्यवहारांविषयी आयकर विभागाने काँग्रेसच्या खजिनदारांना प्रश्न पाठवून लेखी स्वरुपात चौकशी केली होती. या प्रश्नांना काँग्रेसने समाधानकारक उत्तर दिले नाही. यानंतर नियमांचा आधार घेत आयकर विभागाने काँग्रेसच्या बँक खात्यातील विशिष्ट रक्कम गोठवली आहे. या संदर्भात काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली. आयकर विभागाच्या कारवाईमुळे आर्थिक अडचणी वाढल्या असल्याचे आणि लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करणे कठीण झाल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number