मनसे महायुतीत येणार ?

मुंबई, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या तीन नेत्यांची मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मनसे महायुतीत आल्यास कोणकोणत्या जागा लढवणार आणि महायुतीला पूरक राहिल्यास कोणकोणत्या जागा लढवणार अशा दोन्ही पर्यायांवर चर्चा झाल्याचे समजते. अद्याप निर्णय […]

मनसे महायुतीत येणार ?

मुंबई, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या तीन नेत्यांची मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मनसे महायुतीत आल्यास कोणकोणत्या जागा लढवणार आणि महायुतीला पूरक राहिल्यास कोणकोणत्या जागा लढवणार अशा दोन्ही पर्यायांवर चर्चा झाल्याचे समजते. अद्याप निर्णय जाहीर झालेला नाही. पण मनसे महायुतीत सहभागी झाली अथवा महायुतीला पूरक राहिली तरी लोकसभा निवडणुकीत कोणाला फायदा होणार यावरून चर्चेला उधाण आले आहे.

शिंदे सरकारच्या स्थापनेपासूनच मनसे आणि महायुतीच्या नेत्यांची अधूनमधून चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नियोजन करून राज ठाकरे दिल्लीवारी करून आले. दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शाह यांची एक बैठक झाली. या बैठकीत राज आणि अमित शाह या दोन नेत्यांव्यतिरिक्त इतर कोणीही नेते नव्हते. या बैठकीनंतर आता मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांनी चर्चा केली. यामुळे मनसे काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number