मुंबईत बारामतीबाबत ‘सागर’मंथन

मुंबई, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चेसाठी हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईत सागर बंगल्यावर हर्षवर्धन पाटील आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेच्या मागील चारही निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. यामुळे लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीकरिता बारामतीतले डावपेच आखण्यासाठी फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा […]

मुंबईत बारामतीबाबत ‘सागर’मंथन

मुंबई, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चेसाठी हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईत सागर बंगल्यावर हर्षवर्धन पाटील आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली.

बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेच्या मागील चारही निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. यामुळे लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीकरिता बारामतीतले डावपेच आखण्यासाठी फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा केली. सकाळी ११ च्या सुमारास हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे हे दोघेही सागर बंगल्यावर दाखल झाले. दोघांनी फडणवीसांसोबत चर्चा केली. याआधी मुंबईत देवगिरी बंगल्यावर अजित पवारांनी माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी बारामतीच्या मुद्यावर चर्चा केली.

बारामती लोकसभा मतदारसंघातून राशपचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती पवारांच्या कन्येला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number