मनसे महायुतीमध्ये जाण्याच्या हालचालींना वेग

नवी दिल्ली, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी दिल्लीला रवाना झाले होते. चार दिवसांत त्यांची ही दुसऱ्यांदा दिल्ली वारी होती. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना वेग आला आहे. परंतु दिल्लीत सोमवारी कोअर कमिटीची बैठक होती. या कारणाने राज ठाकरे यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक होऊ शकली नाही. मंगळवारी […]

मनसे महायुतीमध्ये जाण्याच्या हालचालींना वेग

नवी दिल्ली, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी दिल्लीला रवाना झाले होते. चार दिवसांत त्यांची ही दुसऱ्यांदा दिल्ली वारी होती. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना वेग आला आहे. परंतु दिल्लीत सोमवारी कोअर कमिटीची बैठक होती. या कारणाने राज ठाकरे यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक होऊ शकली नाही. मंगळवारी सकाळी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात भेट होणार आहे. ही बैठक राज ठाकरे, अमित शाह आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात होणार आहे. मंगळवारी दिवसभरात कोणत्याही क्षणी मनसे पक्ष महायुतीचा मित्रपक्ष म्हणून घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळेल अशी आशा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number