श्रीनिवास पवारांचे मुलासाठी लॉबिंग

बारामती, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : श्रीनिवास पवार हे आजपर्यंत कुठेही राजकीय क्षेत्रात दिसले नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी माझं कुटुंब माझ्यासोबत नसेल. पण बारामतीची जनता हेच माझे कुटुंब आहे असं म्हटलं होतं. ते वास्तव आहे. श्रीनिवास पवार काटेवाडीत जे काही बोलले, घरातीलच माणसं एकमेकांविरोधात उभं करण्याची ही जुनीच पद्धत आहे. सख्खा भाऊ विरोधात उभा […]

श्रीनिवास पवारांचे मुलासाठी लॉबिंग

बारामती, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : श्रीनिवास पवार हे आजपर्यंत कुठेही राजकीय क्षेत्रात दिसले नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी माझं कुटुंब माझ्यासोबत नसेल. पण बारामतीची जनता हेच माझे कुटुंब आहे असं म्हटलं होतं. ते वास्तव आहे. श्रीनिवास पवार काटेवाडीत जे काही बोलले, घरातीलच माणसं एकमेकांविरोधात उभं करण्याची ही जुनीच पद्धत आहे. सख्खा भाऊ विरोधात उभा केला तर आपण निवडणूक जिंकू शकतो असं वरिष्ठांना वाटत असेल तर हा त्यांच्या भ्रमाचा भोपळा आहे. तो कधीही फुटू शकतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. अजित पवार हा नालायक माणूस आहे तर ते वयस्कर माणसाची किंमत करत नाही, असं वक्तव्य श्रीनिवास पवार बारामतीतील काटेवाडीत बोलताना केलं.

‘संघाने पवार कुटुंब फोडलं’, पवारांकडून भावनिक राजकारण

कोण आहेत श्रीनिवास पवार ?

श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत.
उद्योजक असून कृषी क्षेत्रात त्यांचे उद्योग आहेत.
त्यांचा शरयू समूह अनेक कंपन्या चालवतो.
व्यवसायाची सुरूवात ऑटोमोबाइल डीलर म्हणून केली
यशस्वी ऑटोमोबाइल डीलर्सपैकी एक म्हणून त्यांची ओळख

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number