नाशिक, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुका जाहीर होताच महायुतीत नशिकच्या जागेवरून धुसफूस वाढल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे निवडून येणार नाहीत, त्यामुळे ही जागा भाजपाने लढवावी अशी मागणी भाजपाचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी केली आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत नाशिकची जागा भाजपाला मिळावी अशी मागणी स्थानिक नेत्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. आता नाशिकच्या जागेवर वरिष्ठ पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.