दोन दिवसात मविआचं जागावाटप जाहीर होणार

मुंबई, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी :  राशप नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी रात्री पार पडली. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागावाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मात्र, बैठकीदरम्यान वंचित बहुजन आघाडी पक्षाला कोणताही प्रस्ताव जाणार नाही यावर मविआतील सर्वा नेत्यांचे एकमत झाले. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत होणार असल्याने […]

दोन दिवसात मविआचं जागावाटप जाहीर होणार

मुंबई, १७ मार्च २०२४, प्रतिनिधी :  राशप नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी रात्री पार पडली. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागावाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. मात्र, बैठकीदरम्यान वंचित बहुजन आघाडी पक्षाला कोणताही प्रस्ताव जाणार नाही यावर मविआतील सर्वा नेत्यांचे एकमत झाले. भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत होणार असल्याने त्यावरही चर्चा झाली. शिवसेनेच्या उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि राशपचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेत सहभागी होणार आहेत. तसेच येत्या दोन – तीन दिवसांत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला देखील जाहीर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number