सुधा मूर्ती झाल्या राज्यसभेच्या खासदार

नवी दिल्ली, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : सुधा मूर्ती यांनी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती जगदीश धनखड, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि इन्फोसिसचे संस्थापक तसेच सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती यांच्या उपस्थितीत सुधा मूर्ती यांनी खासदारकीची शपथ घेतली. सुधा मूर्ती यांच्या खासदारकीचा कार्यकाळ सहा वर्षांचा आहे. या काळात विविध प्रश्नांवर […]

सुधा मूर्ती झाल्या राज्यसभेच्या खासदार

नवी दिल्ली, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : सुधा मूर्ती यांनी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती जगदीश धनखड, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि इन्फोसिसचे संस्थापक तसेच सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती यांच्या उपस्थितीत सुधा मूर्ती यांनी खासदारकीची शपथ घेतली. सुधा मूर्ती यांच्या खासदारकीचा कार्यकाळ सहा वर्षांचा आहे. या काळात विविध प्रश्नांवर जनतेचा आवाज म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन काही दिवसांपूर्वी पार पडले. आता संसदेचे पावसाळी अधिवेशन होईल. हे अधिवेशन नव्या सरकारच्या उपस्थितीत पार पडेल. देशात लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे खासदार म्हणून राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होण्याची संधी सुधा मूर्ती यांना पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदा मिळेल.

सुधा मूर्ती ७३ वर्षांच्या आहेत. समाजसेविका, अभियंता, लेखिका आणि आता राज्यसभा खासदार झालेल्या सुधा मूर्ती यांनी दीर्घकाळ इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांच्या नावाची शिफारस ८ मार्च रोजी म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनी केली होती. सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे संस्थापक आहेत तर जावई ऋषी सूनक इंग्लंडचे पंतप्रधान आहेत.

महिला अभियंता ते समाजसेविका

सुधा मूर्ती या टाटा समुहाच्या टेल्को कंपनीच्या पहिल्या महिला अभियंता होत्या. पतीला साथ देत त्यांनी इन्फोसिसच्या स्थापनेसाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवले होते. नंतर इन्फोसिसच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले. कंपनीच्या सामाजिक कार्य विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुधा मूर्ती यांनी नंतर महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी दीर्घ काळ काम केले.

कोण आहेत सुधा मूर्ती ?

सामाजिक कार्यासाठी २०२३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरव
सामाजिक कार्यासाठी २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव
शिक्षिका आणि लेखिका, अनेक कथासंग्रह, कादंबरी यांचे लेखन केले
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची पत्नी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number