भाजपाची दुसरी यादी; गडकरी, पंकजा मुंडेंना उमेदवारी

नवी दिल्ली, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली. भाजपाने पहिल्या यादीतून १९५ तर दुसऱ्या यादीतून ७२ उमेदवारांची नावं जाहीर केली. महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावं दुसऱ्या यादीतून जाहीर करण्यात आली. याआधी पहिल्या यादीत राज्यातून एकाही उमेदवाराच्या नावाचा उल्लेख नव्हता. नितीन गडकरींना नागपूरमधून तर पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी मिळाली आहे. भाजपाने […]

भाजपाची दुसरी यादी; गडकरी, पंकजा मुंडेंना उमेदवारी

नवी दिल्ली, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली. भाजपाने पहिल्या यादीतून १९५ तर दुसऱ्या यादीतून ७२ उमेदवारांची नावं जाहीर केली. महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावं दुसऱ्या यादीतून जाहीर करण्यात आली. याआधी पहिल्या यादीत राज्यातून एकाही उमेदवाराच्या नावाचा उल्लेख नव्हता. नितीन गडकरींना नागपूरमधून तर पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी मिळाली आहे. भाजपाने गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, प्रीतम मुंडे, उन्मेष पाटील, संजय धोत्रे यांचे तिकीट कापले.

भाजपाच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावं

लोकसभा निवडणूक २०२४, भाजपाची दुसरी यादी
नंदूरबारमधून हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे
जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे
अकोल्यातून अनुप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस
नागपूरमधन नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार
नांदेडमधून प्रतापराव चिखालीकर, जालन्यातून रावसाहेब दानवे
दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील
मुंबई उत्तरमधून पीयूष गोयल, मुंबई ईशान्यमधून मिहीर कोटेचा
पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील
बीडमधून पंकजा मुंडे, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे
माढ्यातून रणजीत नाईक निंबाळकर, सांगलीतून संजयकाका पाटील

भाजपाची दुसरी यादी, कोणत्या राज्यातून किती उमेदवार जाहीर ?

गुजरात – ७ उमेदवार
दिल्ली- २ उमेदवार
हरियाणा- ६ उमेदवार
हिमाचल प्रदेश- २ उमेदवार
कर्नाटक- २० उमेदवार
मध्य प्रदेश – ५ उमेदवार
उत्तराखंड- २ उमेदवार
महाराष्ट्र- २० उमेदवार
तेलंगाना- ६ उमेदवार
त्रिपुरा- १ उमेदवार

महाराष्ट्रातील २० पैकी १५ उमेदवार जुने तर ५ नवे उमेदवार आहेत

जळगाव – उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ
ईशान्य मुंबई – मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेचा
उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पीयूष गोयल
बीड – प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे
अकोला – संजय धोत्रे यांच्याऐवजी अनुप धोत्रे

नितीन गडकरी, सुभाष भामरे, रक्षा खडसे, रामदास तडस, कपिल पाटील, संजयकाका पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी

दादरा नगर हवेलीमधून कलाबेन मोहन डेलकर यांना उमेदवारी मिळाली आहे. मोहन डेलकरांच्या निधनानंतर उद्धव यांच्या पक्षाकडून त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती. पण यावेळी त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली आहे.

करनालमधून मनोहरलाल खट्टर
पूर्व दिल्लीतून हर्ष मल्होत्रा
वायव्य दिल्लीतून योगेंद्र चंदोलिया

तीन माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी
१. मनोहरलाल खट्टर (हरियाणा) , करनाल
२. बसवराज बोम्मई (कर्नाटक), हावेरी
३. त्रिवेंद्र सिंह रावत (उत्तराखंड), हरिद्वार

दिल्लीतून हंसराज हंस यांचे तिकीट कापले
हर्ष मल्होत्रा, पूर्व दिल्ली
योगेंद्र चंदोलिया, वायव्य दिल्ली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number