काँग्रेस नेता मोहन जोशींनी घेतली वसंत मोरेंची भेट

पुणे, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी मनसेला अखेरचा रामराम ठोकला. यावेळी त्यांनी कुठल्याही पक्षात जाण्याची भूमिका जाहीर केली नव्हती. दोन दिवसात माझी भूमिका जाहीर करणार असल्याचे मोरेंनी सांगितले होते. पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी आज वसंत मोरे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. या भेटीनंतर मोरे यांनी आपली […]

काँग्रेस नेता मोहन जोशींनी घेतली वसंत मोरेंची भेट

पुणे, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मंगळवारी मनसेला अखेरचा रामराम ठोकला. यावेळी त्यांनी कुठल्याही पक्षात जाण्याची भूमिका जाहीर केली नव्हती. दोन दिवसात माझी भूमिका जाहीर करणार असल्याचे मोरेंनी सांगितले होते. पुणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी आज वसंत मोरे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. या भेटीनंतर मोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी लोकसभा लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करावा याबाबत जोशींनी माझी भेट घेतली आहे. मी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे मोरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी काल मोरेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली होती. तर आता मोरेंना काँगेसची ऑफर आली आहे. त्यामुळे मोरे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number