वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा रामराम

पुणे – मनसेचे नेते वसंत मोरे आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठांचे सर्वकाही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा रामराम ठोकला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच मोरे हे सुप्रिया यांच्यासोबत जाणार असल्याचं समजतंय. वसंत मोरे यांनी मध्यरात्री १२ वाजता एक पोस्ट लिहिली होती. “एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस […]

वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा रामराम

पुणे – मनसेचे नेते वसंत मोरे आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठांचे सर्वकाही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा रामराम ठोकला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच मोरे हे सुप्रिया यांच्यासोबत जाणार असल्याचं समजतंय.

वसंत मोरे यांनी मध्यरात्री १२ वाजता एक पोस्ट लिहिली होती. “एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही”, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मध्यरात्री नाराजी व्यक्त करत दुपारी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मनसे नेते वसंत मोरे हे त्यांच्या धडाडीच्या कार्यशैलीसाठी ओळखले जायचे. पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना त्यांना वेगळा ठसा उमटवला होता. त्याचबरोबर शहरामध्ये मनसेची वाढ करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार होता. मात्र गेले काही दिवस ते पक्षांतर्गत संघर्षामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू होती.

दरम्यान, पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असलेले वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर मोरे राजकारणाची दिशा बदलणार का अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number