शिउबाठाच्या आमदाराला मराठ्यांनी गावातून हाकललं

कन्नड, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : कन्नड तालुक्यातील करंजखेड गावात शिउबाठा गटाचे आमदार उदयसिंग राजपूत हे विकासकामाचे उदघाटन करण्यासाठी गेले. त्यावेळी गावातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत आमच्या गावात यायचे नाही असे म्हणत मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी आमदार राजपूत यांना मज्जाव करत ‘वापस […]

शिउबाठाच्या आमदाराला मराठ्यांनी गावातून हाकललं

कन्नड, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : कन्नड तालुक्यातील करंजखेड गावात शिउबाठा गटाचे आमदार उदयसिंग राजपूत हे विकासकामाचे उदघाटन करण्यासाठी गेले. त्यावेळी गावातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत आमच्या गावात यायचे नाही असे म्हणत मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

त्यांनी आमदार राजपूत यांना मज्जाव करत ‘वापस जा, वापस जा’ अशा घोषणा देऊन हाकलून लावले. गावात सिमेंट रोडच्या कामाचे उद्घाटन आमदार राजपूत यांच्या हस्ते होणार होते. त्यानंतर गावात सभेचे नियोजन ही होते. मात्र, सकल मराठा समाजाने हा कार्यक्रम उधळून लावल्याने अखेर गावच्या कमानी बाहेरूनच आमदार उदयसिंग राजपूत यांना उदघाटन करून जावे लागले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number