सांगली लोकसभा काँगेसचं लढवणार

सांगली, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विशाल पाटील यांच्या ऐवजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून चंद्रहार पाटील यांना देण्याबाबत जोरदार चर्चा  सुरू आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील जागा काँग्रेस लढवणार असल्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे. सांगली मतदारसंघातील जागा कोणाला मिळणार शिउबाठा कि काँग्रेस यावरून उलटसुलट चर्चा […]

सांगली लोकसभा काँगेसचं लढवणार

सांगली, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विशाल पाटील यांच्या ऐवजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून चंद्रहार पाटील यांना देण्याबाबत जोरदार चर्चा  सुरू आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील जागा काँग्रेस लढवणार असल्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे.

सांगली मतदारसंघातील जागा कोणाला मिळणार शिउबाठा कि काँग्रेस यावरून उलटसुलट चर्चा केली जात आहे. त्यावर सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे. तुम्ही कामाला लागा असा स्पष्ट निरोप आम्हाला मिळाला आहे. सध्या काही बातम्या पेरल्या जात आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभ्रमित होऊ नये. सांगली मतदारसंघातील जागा काँग्रेसच लढेल. आमदार विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वात आम्ही ताकदीने लढू, असे काँग्रेसच्या उमेदवाराचे दावेदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मविआमध्ये जागा वाटपावरून नेहमी संभ्रम निर्माण होत असतो. अशातच आता सांगली लोकसभा मतदारसंघ कोण लढवणार अशा प्रश्नावर स्पष्ट मत दर्शवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number