वाराणसी, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीचा पहिला दौरा केला. पंतप्रधान वाराणसीच्या बाबतपूर विमानतळावर उतरले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांची स्वागत केले. विमानतळावरून पंतप्रधान मोदी थेट काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले. दर्शनानंतर पंतप्रधान मोदी यांनी काशीत अर्थात वाराणसी लोकसभा मतदारसंघात रोड शो केला. पंतप्रधान मोदींना अभिवादन करण्यासाठी वाराणसीच्या रस्त्यांच्या दुतर्फा आबालवृद्धांनी गर्दी केली. मोदींच्या वाराणसीच्या नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले. मोदींना बघताच हर हर महादवे, जय श्रीराम, मोदी मोदी अशा घोषणा सुरू झाल्या.