चंद्राबाबू रालोआत परतले

नवी दिल्ली, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीआधी चंद्राबाबू नायडू त्यांच्या तेलगू देसम पक्षासह रालोआमध्ये परतले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये भाजपा, तेलगू देसम पक्ष आणि पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष या तीन पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्रमध्ये लोकसभेच्या दोन जागा जनसेना पक्ष तर सहा जागा भारतीय जनता पार्टी लढवणार आहे. राज्याच्या […]

चंद्राबाबू रालोआत परतले

नवी दिल्ली, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीआधी चंद्राबाबू नायडू त्यांच्या तेलगू देसम पक्षासह रालोआमध्ये परतले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये भाजपा, तेलगू देसम पक्ष आणि पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष या तीन पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्रमध्ये लोकसभेच्या दोन जागा जनसेना पक्ष तर सहा जागा भारतीय जनता पार्टी लढवणार आहे. राज्याच्या पातळीवर मोठी ताकद असल्यामुळे आंध्रमधून तेलगू देसम पक्ष लोकसभेच्या १७ जागा लढवणार आहे.

विधानसभेचा फॉर्म्युला

आंध्रमध्ये विधानसभेच्यावेळी आम्ही १४५ जागा लढवू आणि उरलेल्या ३० जागा या भाजपा आणि जनसेना पक्ष या दोन पक्षांना मिळतील. परस्पर चर्चेतून कोणती जागा कोण लढवणार याचा अंतिम निर्णय होईल, असे तेलगू देसम पक्षाकडून सांगण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number