‘मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची नाही’

नाशिक, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको, माझ्यात आहे ताकद तेवढी, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षात निष्ठावानांना प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले. मनसेचा अठरावा वर्धापन दिन नाशिक येथे साजरा झाला. याप्रसंगी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी तुफान […]

‘मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची नाही’

नाशिक, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको, माझ्यात आहे ताकद तेवढी, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षात निष्ठावानांना प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले. मनसेचा अठरावा वर्धापन दिन नाशिक येथे साजरा झाला. याप्रसंगी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली. अनेक विषयांवर भाष्य केले.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
मनसेत जातीभेदाला स्थान नाही
मराठा आरक्षणासाठी केंद्राला पुढाकार घ्यावा लागेल
सध्या मराठा आरक्षणावरून फक्त राजकारण सुरू आहे
मराठ्यांना आरक्षण मिळू नये असं नाही तर तांत्रिकदृष्ट्या ते तितकंच किचकट आहे
राजकारणाचा विचका झाला आहे, अनेकांना मनसेकडून आशा
भोंगे आंदोलनात सरकारने मनसे १७ हजार जणांविरोधात खटले भरले
राज्य माझ्या हाती द्या, त्रासदायक भोंगे बंद करून टाकेन
आमची आंदोलनं यशस्वी झाली. अनेक टोलनाके बंद केले… अनेक ठिकाणी दुकानांवर मराठी पाट्या दिसू लागल्या… भोंग्यांच्या आंदोलनालाही उल्लेखनीय यश मिळाले…
अरबी समुद्रातल्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले ?
मुंबई – गोवा आणि मुंबई – नाशिक रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार ?
महाराष्ट्रात काँग्रेस नंतर ३ पक्ष जन्माला आले… जनसंघ म्हणजे आताचा भाजपा… दुसरा शिवसेना आणि तिसरा मनसे…. राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर निवडून येणाऱ्या लोकांची मोळी….
मी यश खेचून आणणार. सध्या पक्षांतराचा ट्रेंड आहे. पण दुसऱ्यांची पोरं मला कडेवर घेऊन फिरायची नाहीत. मला राजकारणात माझे सहकारी मोठे करायचे आहेत.
राजकारणात प्रचंड संयम लागतो. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संयम असलाच पाहिजे.
मोदींच्या रूपात भाजपा जे यश अनुभवतोय त्यात मोदींची मेहनत आहेच पण कार्यकर्त्यांची अनेक वर्षांची मेहनत सुद्धा आहे
पक्षाच्या यशात मेहनत, संयम आणि संघर्ष महत्त्वाचा
समाजमाध्यमाचा राजकीयदृष्ट्या योग्य आणि प्रभावी वापर करा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number