मनसेचा वर्धापनदिन नाशिकमध्ये

नाशिक, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये मनसे पक्षाचा १८ वा वर्धापनदिन यावर्षी त्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहेत तसेच उद्या राज ठाकरे सहकुटुंब काळाराम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे पक्षाच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. […]

मनसेचा वर्धापनदिन नाशिकमध्ये

नाशिक, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये मनसे पक्षाचा १८ वा वर्धापनदिन यावर्षी त्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहेत तसेच उद्या राज ठाकरे सहकुटुंब काळाराम मंदिरात जाऊन महाआरती करणार आहेत. नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरे पक्षाच्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतील याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या भाजपासोबत तसेच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा चालू असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात राज ठाकरे रालोआ सोबत निवडणूक लढतील का? असे प्रश्न संपूर्ण राज्याला पडले आहेत. तर नाशिकमध्ये होणाऱ्या वर्धापनदिनी ते सभेमधून त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची चर्चा आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number