पुण्यात काँग्रेस उमेदवारीसाठी चुरस

पुणे, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची इच्छा दर्शवली आहे. जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, मगच पुणे लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे. बागुलांचं नेमकं म्हणणं काय? मी जाहीर सभा घेतो. पुण्यातील उमेदवार जनमत चाचणी घेऊन […]

पुण्यात काँग्रेस उमेदवारीसाठी चुरस

पुणे, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीची इच्छा दर्शवली आहे. जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, मगच पुणे लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे.

बागुलांचं नेमकं म्हणणं काय?

मी जाहीर सभा घेतो. पुण्यातील उमेदवार जनमत चाचणी घेऊन ठरवा. जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊन उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांना बागुलांनी केली. पुणे लोकसभेसाठी यंदा ही अवलंबवावी अशी त्यांची इच्छा आहे.

कोण आहेत आबा बागुल?

आबा बागुल हे ६ वेळा महापालिकेत नगरसेवक राहिलेले आहेत. गेली ४० वर्षे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. बागुलांचं काँग्रेसमधील काम उल्लेखनीय आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number