नवी दिल्ली, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : महायुतीचे जागावाटप दिल्लीत ठरणार असल्याची चर्चा आहे. अद्याप महायुतीच्या जागावाटपाची घोषणा झालेली नाही. महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चेसाठी भाजपाचे प्रमुख नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर जागावाटपाची घोषणा संध्याकाळी किंवा रात्री होणार असल्याची चर्चा आहे.
याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागा लढवल्या त्या सर्व जागा मिळाव्या अशी मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केली. यानंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा केली. या चर्चेतून प्रश्न सुटला नाही. अखेर भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते जागावाटपाबाबत चर्चेसाठी दिल्लीला रवाना झाले.