महादेव जानकर यांचं ठरलं

माढा, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : राशप नेते शरद पवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यात काल रात्री चर्चा झाली. महादेव जानकर महाविकास आघाडीतून माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला दिली आहे.  माढा मतदारसंघातील जागा शरद पवार सोडणार असल्याचा निर्णय दोन दिवसात त्यांच्याकडून घेण्यात […]

महादेव जानकर यांचं ठरलं

माढा, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : राशप नेते शरद पवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यात काल रात्री चर्चा झाली. महादेव जानकर महाविकास आघाडीतून माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला दिली आहे.  माढा मतदारसंघातील जागा शरद पवार सोडणार असल्याचा निर्णय दोन दिवसात त्यांच्याकडून घेण्यात येईल.

मविआतून माढासाठी जानकरांची उमेदवारी निश्चित

काल रात्री पवार आणि जानकर यांच्यात माढा मतदारसंघातातील लोकसभेच्या जागेसाठी चर्चा झाली. जानकर महाविकास आघाडीत आले तर त्यांना माढा मतदारसंघातील जागा लढवण्यासाठी दिली जाईल. या चर्चेदरम्यान जानकर महाविकास आघाडीत आले तर पवार त्यांची माढा मतदारसंघातील उमेदवारीची जागा जानकरांना देतील. जानकर मविआतून माढा मतदारसंघातील जागा लढण्यास तयार असल्याचे जवळपास निश्चितच झाले आहे.

पवार माढातील जागा सोडणार

लोकसभा निवडणुक जाहीर होण्याआधी महादेव जानकर माढा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत माहिती शरद पवार दोन दिवसात देणार आहेत. जानकरांमुळे पवार त्यांची माढा मतदारसंघातील जागा सोडण्यास तयार झाले आहेत. याआधी जानकर स्वतंत्र लढण्याचे सूर दिसून येत होते मात्र या दोन नेत्यांच्या चर्चेनंतर जानकर महाविकास आघाडीतून माढासाठी निवडणुक लढणार असल्याचे चित्र समोर आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number