पुण्यात मेट्रोचा नवीन मार्ग सुरू

पुणे , ६ मार्च २०२४ , प्रतिनिधी : पुण्यात आज (६ मार्च २०२४ रोजी) नव्या मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहत या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. ही नवी मार्गिका पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी यांना जोडते. मेट्रोच्या या नव्या मार्गिकेमुळे वनाजवरून नगर रस्त्यावरील रामवाडीला जाण्यासाठी मेट्रोने फक्त ३६ मिनिटे […]

पुण्यात मेट्रोचा नवीन मार्ग सुरू

पुणे , ६ मार्च २०२४ , प्रतिनिधी : पुण्यात आज (६ मार्च २०२४ रोजी) नव्या मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहत या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. ही नवी मार्गिका पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी यांना जोडते. मेट्रोच्या या नव्या मार्गिकेमुळे वनाजवरून नगर रस्त्यावरील रामवाडीला जाण्यासाठी मेट्रोने फक्त ३६ मिनिटे लागणार असून, त्यासाठी प्रवास भाडे ३० रुपये असेल.

रामवाडी स्थानकामुळे मेट्रो आता नगर रस्त्याला जोडली गेली आहे. त्यामुळे आता ‘पीएमपी’शी चर्चा करून फिनिक्स मॉल, खराडी, चंदननगर आणि वाघोली हा भाग ‘पीएमपी’च्या बसने रामवाडी मेट्रो स्थानकाला जोडण्यात येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number