Tuesday, July 02, 2024 08:06:03 AM

छ.संभाजीनगर महापालिकेचा अर्थसंकल्प ६ मार्चला होणार सादर

छसंभाजीनगर महापालिकेचा अर्थसंकल्प ६ मार्चला होणार सादर

छत्रपती संभाजीनगर, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा सन २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर होणार आहे. ४ हजार कोटीचा हा अर्थसंकल्प असून गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १हजार कोटींची वाढ होऊन तो ४ हजार कोटी वर गेलाय. २००० पानांचा हा अर्थसंकल्प मनपाआयुक्त जी. श्रीकांत बुधवारी स्थायी समिती पुढे मांडणार आहे. दरम्यान अर्थसंकल्पातील सुमारे २ हजार कोटी रुपये विविध योजनेअंतर्गत हे शासनाकडून येतील. यामध्ये ८२२ कोटी रुपये नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी सॉफ्ट लोन, गटार योजनेसाठी १ हजार कोटी, कचरा प्रश्नासाठी ६७ कोटी असे सुमारे २ हजार कोटी रुपये शासनाकडून येथील व याच कामासाठी खर्च होतील.


सम्बन्धित सामग्री