न्हावा शेवा, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा बंदरात पाकिस्तानचे जहाज पकडण्यात आले. या जहाजात पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमासाठी आवश्यक साहित्य आहे. पकडलेले जहाज चीनमधून आले होते आणि पाकिस्तानला जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या आण्विक हल्ला करण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्रांशी संबंधित सुटे भाग चीनमधून आलेल्या जहाजात आहेत. हे जहाज अरबी समुद्रातून पाकिस्तानमधील कराची बंदराच्या दिशेने जात होते. चीनमधून आलेले जहाज न्हावा शेवा बंदरात रोखून धरण्यात आले आहे. जहाजावरील साहित्याची तपासणी करण्यासाठी डीआरडीओचे पथक बोलावण्यात आले आहे.