दुतोंडी पवार, मोदींवर टीका पण त्यांच्या योजनांचे समर्थन

बारामती, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनाला शरद पवारांनी हजेरी लावली. एरवी शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. पण नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचे जाहीर समर्थन केले. याआधी नमो महारोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद […]

दुतोंडी पवार, मोदींवर टीका पण त्यांच्या योजनांचे समर्थन

बारामती, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या उद्घाटनाला शरद पवारांनी हजेरी लावली. एरवी शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. पण नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचे जाहीर समर्थन केले.

याआधी नमो महारोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद झाला. निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख आहे. पण राज्यसभा खासदार शरद पवार यांचे नाव नाही. यावरून चर्चेला उधाण आले असतानाच पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घरी जेवणासाठी येण्याचे आमंत्रण दिले. पण व्यापामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जेवणाचे आमंत्रण नाकारले. यानंतर नवी निमंत्रण पत्रिका छापून पवारांना नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आले. पवारांनी उद्घाटनाला हजेरी लावली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचे जाहीर समर्थन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number