सुप्रिया सुळे यांना मतदारांनी नाकारले ?

बारामती, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : सुप्रिया सुळे यांची एक ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर चांगलीच व्हायरल होत आहे. बारामती लोकसभेतील प्रचाराच्या निमित्ताने सुप्रिया यांच्याकडून झालेल्या संपर्काला देण्यात आलेलं उत्तर या ऑडिओ क्लिपद्वारे चांगलंच व्हायरल झाले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळे मतदारांशी बोलताना ‘तुतारीवाला माणूस पोचला की, नाही गावात?’ असा प्रश्न विचारला. त्यावर ‘ताई, आम्ही वहिनींचा […]

सुप्रिया सुळे यांना मतदारांनी नाकारले ?

बारामती, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : सुप्रिया सुळे यांची एक ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर चांगलीच व्हायरल होत आहे. बारामती लोकसभेतील प्रचाराच्या निमित्ताने सुप्रिया यांच्याकडून झालेल्या संपर्काला देण्यात आलेलं उत्तर या ऑडिओ क्लिपद्वारे चांगलंच व्हायरल झाले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळे मतदारांशी बोलताना ‘तुतारीवाला माणूस पोचला की, नाही गावात?’ असा प्रश्न विचारला. त्यावर ‘ताई, आम्ही वहिनींचा प्रचार करतोय’, असे उत्तर मतदारांकडून सुप्रिया यांना देण्यात आले. यामुळे निवडणुकीपूर्वीच मतदारांचा कौल समोर आला आहे का आणि सुप्रिया सुळे यांना मतदारांनी नाकारले आहे का?, असे प्रश्न निर्माण होत आहेत.

ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना सुळे म्हणाल्या, ‘तुतारीवाला माणूस पोचला की नाही गावात?’, आमचं चिन्ह आहे तुतारीवाला माणूस, त्यावेळेस ‘ताई, आम्ही वहिनींचा प्रचार करतोय’, असे उत्तर मतदारांकडून सुप्रिया यांना देण्यात आले.

बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार ?

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून दोघींनी केलेल्या कार्याची माहिती देणारे रथ मतदारसंघात फिरत आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार मतदारसंघात फिरून जनसंपर्क वाढवत आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी बारामतीत फोनद्वारे मतदारांना संपर्क साधला. याप्रसंगी समोरून सुप्रिया सुळेंना अनपेक्षित उत्तर आले. ‘ताई, आम्ही वहिनींचा प्रचार करतोय’, असे उत्तर मतदारांकडून सुप्रिया यांना देण्यात आले. यामुळे मतदारांमध्ये सुप्रियाताई अर्थात सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा सुनेत्रा वहिनी अर्थात सुनेत्रा अजित पवार यांना जास्त समर्थन असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number