पवारांचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी नाकारलं

मुंबई, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने बारामतीत येत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राशपच्या शरद पवारांनी घरी जेवणासाठी येण्याचे आमंत्रण दिले होते. पण कामांच्या व्यस्ततेमुळे येणे शक्य नाही असे कळवत मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त […]

पवारांचं आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी नाकारलं

मुंबई, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने बारामतीत येत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राशपच्या शरद पवारांनी घरी जेवणासाठी येण्याचे आमंत्रण दिले होते. पण कामांच्या व्यस्ततेमुळे येणे शक्य नाही असे कळवत मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

याआधी नमो महारोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद झाला. निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख आहे. पण राज्यसभा खासदार शरद पवार यांचे नाव नाही. यावरून चर्चेला उधाण आले असतानाच पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घरी जेवणासाठी येण्याचे आमंत्रण दिले. पण व्यापामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करत आमंत्रण नाकारले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number