कंत्राटी वीज कर्मचारी संपावर जाणार

नागपूर, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी बुधवारपासून दोन दिवस, तर ५ मार्चपासून ‘बेमुदत कामबंद’ची हाक दिली आहे. कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार संघटना आणि तिन्ही कंपन्यांची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला नाही. यामुळे कामगारांनी संपाची हाक दिली आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी पहिल्या […]

कंत्राटी वीज कर्मचारी संपावर जाणार

नागपूर, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी बुधवारपासून दोन दिवस, तर ५ मार्चपासून ‘बेमुदत कामबंद’ची हाक दिली आहे. कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार संघटना आणि तिन्ही कंपन्यांची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला नाही. यामुळे कामगारांनी संपाची हाक दिली आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील कंत्राटी कामगारांनी पहिल्या टप्प्यात २८ फेब्रुवारीपासून ४८ तास आणि दुसऱ्या टप्यात ५ मार्चपासून बेमुदत कामबंदची नोटीस दिली आहे. राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सध्या ४२ हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत.

कामगारांच्या मागण्यांमध्ये तिन्ही वीज कंपन्यांमधील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका. कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात १ एप्रिलपासून ३० टक्के वाढ करा, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करा, कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षांपर्यंत कंत्राटदार विरहीत शाश्वत रोजगार द्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी प्रमाणे समान काम समान वेतन द्या, यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number