बसवराज पाटील भाजपाच्या वाटेवर

लातूर, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी मंत्री, औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. ते मंगळवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ बसवराज यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसच्या राजकारणाला आणखी एक धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी अमित देशमुख […]

बसवराज पाटील भाजपाच्या वाटेवर

लातूर, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी मंत्री, औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. ते मंगळवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ बसवराज यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसच्या राजकारणाला आणखी एक धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभेसाठी बसवराज यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव पुढे आला. यानंतर बसवराज यांनी राजीनामा दिला. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number