सुजय विखेंचे तिकीट कापणार ?

अहमदनगर, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपा अहमदनगरमधून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचे वृत्त आहे. अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुजय विखे पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांमुळे त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. पुढची […]

सुजय विखेंचे तिकीट कापणार ?

अहमदनगर, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपा अहमदनगरमधून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचे वृत्त आहे. अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सुजय विखे पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्यांमुळे त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

पुढची पाच वर्ष मलाच दिली पाहिजेत, असा माझा हट्ट नाही. अहमदनगरची उमेदवारी कोणाला द्यावी याचा निर्णय पक्षाच्या पातळीवर होईल. पक्षाला जो योग्य वाटेल त्याला संधी मिळेल. संधी कोणालाही मिळाली तरी सगळे मोदींसाठीच काम करत आहेत आणि करतील, असे सुजय विखे पाटील म्हणाले. ज्या जबाबदारीसाठी जनतेने मला पाच वर्ष निवडून दिलं, ती पाच वर्ष मी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं समाधान आहे; असेही सुजय विखे पाटील म्हणाले.

‘राशपला खंजीर चिन्ह मिळायला हवं होतं’

राशपला खंजीर चिन्ह मिळायला हवं होतं, या शब्दात भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारीऐवजी खंजीर हे निवडणूक चिन्ह मिळायला हवं होतं, असं लक्ष्मण ढोबळे म्हणाल्याची पुस्ती त्यांनी हसत हसत जोडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number