राज यांचा पवारांवर घणाघात

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. शाहू – फुले – आंबेडकर यांची नावं घेत राजकारण करणाऱ्या पवारांनी छत्रपतींचे नाव घेणे टाळले. पण तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाल्यावर पवारांना रायगडाची आठवण झाली. या विरोधाभासावर राज यांनी […]

राज यांचा पवारांवर घणाघात

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. शाहू – फुले – आंबेडकर यांची नावं घेत राजकारण करणाऱ्या पवारांनी छत्रपतींचे नाव घेणे टाळले. पण तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाल्यावर पवारांना रायगडाची आठवण झाली. या विरोधाभासावर राज यांनी भाष्य केले. राज ठाकरे हे शुक्रवारपासून भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे रायगडावर शरद पवार यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या संदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राज यांनी पवारांवर घणाघात केला. लोकसभा निवडणुकीसाठी मनसे चाचपणी करत आहे. अद्याप निर्णय घेतलेला नाही. एकदा निर्णय झाला की जाहीर करू, असेही राज यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number