कोल्हापूर, २३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज लोकसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. ते महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उमेदवारी संदर्भात महाराजांनी राशपचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा केली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. पण महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झालेले नाही. यामुळे महाराजांच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वातील राशपला तुतारी हे पक्ष चिन्ह दिले. यावर प्रतिक्रिया देताना, ‘तुतारी कायम वाजत असते’ असे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज म्हणाले. त्यांनी राशपच्या पक्ष चिन्हाचे स्वागत केले.