ऐश्वर्याचे नाव घेतल्यामुळे राहुल गांधी ट्रोल

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका आठवड्यात चार वेळा ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नावाचा उल्लेख केला. ऐश्वर्या यांच्या नावाचा उल्लेख राहुल यांनी ज्या पद्धतीने केला त्यामुळे ते समाजमाध्यमावर ट्रोल होत आहेत. राम मंदिरात मागासांना बोलावले नाही पण अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्याला तिथे आपण बघितलं असेल असे राहुल चार […]

ऐश्वर्याचे नाव घेतल्यामुळे राहुल गांधी ट्रोल

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका आठवड्यात चार वेळा ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नावाचा उल्लेख केला. ऐश्वर्या यांच्या नावाचा उल्लेख राहुल यांनी ज्या पद्धतीने केला त्यामुळे ते समाजमाध्यमावर ट्रोल होत आहेत.

राम मंदिरात मागासांना बोलावले नाही पण अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्याला तिथे आपण बघितलं असेल असे राहुल चार वेळा म्हणाले. विशेष म्हणजे राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ज्या निवडक मान्यवरांना आमंत्रण होते त्यात अमिताभ बच्चन होते पण बच्चन कुटुंबातील इतर कोणालाही आमंत्रण नव्हते. याच कारणामुळे बच्चन कुटुंबातील इतर सदस्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नव्हते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मंदिरासाठी काम करणाऱ्या कुशल कारागिरांना विशेष आमंत्रण होते. या कारागिरांवर फुले उधळून पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते. पण या वास्तवाचे भान राहुल यांनी बोलताना ठेवले नाही. भाषण करताना राहुल म्हणाले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार दाखवले. नाचणाऱ्या ऐश्वर्याला पण दाखवले. अमिताभ बल्ले बल्ले करत असतानाही दाखवले… आता या मुद्यांवरून समाजमाध्यमावर राहुल ट्रोल होत आहेत.

ऐश्वर्याचे नाव घेतल्यामुळे राहुल गांधी ट्रोल
राहुल यांनी एका आठवड्यात चार वेळा केला ऐश्वर्या यांच्या नावाचा उल्लेख
‘माध्यमांनी मोदींना दाखवले, नाचणाऱ्याला ऐश्वर्याला आणि बल्ले बल्ले करणाऱ्या अमिताभला दाखवले’ असे राहुल म्हणाले
भाषणातील उल्लेखांवरून राहुल समाजमाध्यमावर ट्रोल
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निवडक लोकांनाच होते आमंत्रण
आमंत्रण होते म्हणून आले होते अमिताभ बच्चन
ऐश्वर्या सोहळ्याला नसूनही राहुल यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली
चुकीचे बोलणारे राहुल समाजमाध्यमावर ट्रोल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number