मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निर्णयाचे पडसाद उमटले आहेत. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. पण या निर्णयाची अधिकृत प्रत मिळालेली नाही. मी मुंबई बाहेर आहे त्यामुळे निर्णयाबाबत माहिती नाही, असे झिशान सिद्दीकी यांनी ‘जय महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. झिशान यांना हटवल्यानंतर अखिलेश यादव यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.