कमलनाथ आणि नकुलनाथ भाजपाच्या वाटेवर ?

नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ हे दोघे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून कमलनाथ पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. शनिवारी नकुलनाथने त्याच्या एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडलच्या बायोमध्ये बदल करून काँग्रेसशी संबंधित उल्लेख काढला. दुपारी कमलनाथ आणि […]

कमलनाथ आणि नकुलनाथ भाजपाच्या वाटेवर ?

नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ हे दोघे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून कमलनाथ पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. शनिवारी नकुलनाथने त्याच्या एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडलच्या बायोमध्ये बदल करून काँग्रेसशी संबंधित उल्लेख काढला. दुपारी कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ हे दोघे विमानाने दिल्लीत आले. पण दिल्लीत ते कोणाला भेटायला आले आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यामुळे कमलनाथ आणि नकुलनाथ भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांधी – नेहरू घराण्याशी निष्ठावान असलेले काँग्रेस सोडणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला होता. कमलनाथ काँग्रेस सोडून जाण्याची शक्यता नाही; असे ते म्हणाले होते.

भाजपाच्या कार्यकर्त्याचे ट्वीट

कमलनाथ यांचा माजी माध्यम सल्लागार आणि भाजपाचा प्रवक्ता नरेंद्र सलुजा यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये कमलनाथ दिसत आहेत. ट्वीट केलेल्या फोटोला ‘जय श्रीराम’ अशी फोटो ओळ दिली आहे. हे ट्वीट आल्यामुळे कमलनाथ आणि त्यांचा मुलगा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

कोण आहेत कमलनाथ ?

कमलनाथ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते माजी केंद्रीय शहरी विकास मंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री होते. ते दीर्घकाळ लोकसभा सदस्य राहिलेले नेते आहे. मध्य प्रदेशमधील छिंदवाडा या आदिवासीबहुल भागाचे प्रतिनिधित्व कमलनाथ करतात. याच भागातून ते नऊ वेळा लोकसभेवर गेले आहेत. नेहरू – गांधी कुटुंबाचे विश्वासू अशी त्यांची आतापर्यंतची ओळख आहे. तर कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ हा उद्योगपती आहे. कमलनाथ आणि नकुलनाथ हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number