प्रफुल पटेल सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहा उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाने स्वीकारले आहेत आणि अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद केला आहे. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. विजयी उमेदवारांच्या नावांची औपचारिक घोषणा २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. याआधी उमेदवारांच्या संपत्तीची माहिती उघड झाली आहे. ही माहिती उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिली आहे. […]

प्रफुल पटेल सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहा उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाने स्वीकारले आहेत आणि अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद केला आहे. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. विजयी उमेदवारांच्या नावांची औपचारिक घोषणा २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. याआधी उमेदवारांच्या संपत्तीची माहिती उघड झाली आहे. ही माहिती उमेदवारांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिली आहे. सार्वजनिक झालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल हे राज्यातले राज्यसभेची निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांची वैयक्तिक संपत्ती सर्वात कमी आहे.

प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) : १४९ कोटी रुपयांची जंगम, २८७.७० कोटी रुपयांची स्थावर संपत्ती
मिलिंद देवरा, शिवसेना (महायुती) : ११३.९९ कोटी रुपयांची जंगम, २३.९९ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती
अशोक चव्हाण, भाजपा (महायुती) : १६.९९ कोटी रुपयांची जंगम, ५१.६५ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती
डॉ. अजित गोपछडे, भाजपा (महायुती) : ३ कोटी रुपयांची जंगम, ६३.६९ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती
मेधा कुलकर्णी, भाजपा (महायुती) : २.४३ कोटी रुपयांची जंगम, २.४८ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती
चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस (मविआ) : १.६८ कोटी रुपयांची जंगम, ८६.७३ लाख रुपयांची स्थावर संपत्ती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number