अधिवेशन शिवसेनेचे, अभिनंदन मोदी – शाहंचे

कोल्हापूर, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कोल्हापूर येथे शिवसेनेचे दोन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात शिवसेनेने सहा ठराव मांडले. यातील पहिले तीन ठराव मोदी आणि शाह आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या अभिनंदनाशी संबंधित होते. तर चौथा ठराव मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचा होता. पाचवा ठराव हा राजकीय होता. या ठरावाद्वारे लोकसभेसाठी […]

अधिवेशन शिवसेनेचे, अभिनंदन मोदी – शाहंचे

कोल्हापूर, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कोल्हापूर येथे शिवसेनेचे दोन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात शिवसेनेने सहा ठराव मांडले. यातील पहिले तीन ठराव मोदी आणि शाह आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या अभिनंदनाशी संबंधित होते. तर चौथा ठराव मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचा होता. पाचवा ठराव हा राजकीय होता. या ठरावाद्वारे लोकसभेसाठी भाजपा, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या महायुतीसोबत निवडणूक रिंगणात उतरण्याचा ठराव करण्यात आला. सहावा ठराव हा शिवसैनिकांना पुरस्कार देण्याबाबत करण्यात आला.

पहिला ठराव : राम मंदिर उभारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन
दुसरा ठराव : देशाची प्रगती होण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्री यांनी केलेल्या कामासाठी अभिनंदन
तिसरा ठराव : कलम ३७० हटवणे, जम्मू – काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत करण्यासाठी घेतलेले निर्णय, महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी घेतलेले निर्णय यासाठी अभिनंदन
चौथा ठराव : महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि जनहिताच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न याकरिता मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांचे अभिनंदन
पाचवा ठराव : लोकसभेसाठी भाजपा, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या महायुतीसोबत निवडणूक रिंगणात उतरण्याचा ठराव
सहावा ठराव : शिवसैनिकांना पुरस्कार देण्याचा ठराव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number