‘उपोषण सुरूच राहणार’

जालना, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळेल. या लाभार्थ्यांच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार, असे मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा राज्य शासनाला दिला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा राज्याचे […]

‘उपोषण सुरूच राहणार’

जालना, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळेल. या लाभार्थ्यांच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार, असे मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा राज्य शासनाला दिला.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेले आहे. ही घोषणा करतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांना उपोषण थांबवण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number