काँग्रेसकडून हंडोरेंना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रात झालेल्या मागील निवडणुकीत पण काँग्रेसने हंडोरेंना उमेदवारी दिली होती. पण त्या निवडणुकीत हंडोरेंचा पराभव झाला होता. यंदा आमदारांच्या संख्याबळामुळे महाविकास आघाडीला त्यांचा एकच उमेदवार निवडून आणणे शक्य आहे. यामुळे हंडोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विजयासाठी काँग्रेसकडून नियोजन […]

काँग्रेसकडून हंडोरेंना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रात झालेल्या मागील निवडणुकीत पण काँग्रेसने हंडोरेंना उमेदवारी दिली होती. पण त्या निवडणुकीत हंडोरेंचा पराभव झाला होता. यंदा आमदारांच्या संख्याबळामुळे महाविकास आघाडीला त्यांचा एकच उमेदवार निवडून आणणे शक्य आहे. यामुळे हंडोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विजयासाठी काँग्रेसकडून नियोजन सुरू आहे. भाजपाचे तीन, शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. फक्त सहा उमेदवार दिले गेले तर हे उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतील. पण भाजपाने तीन ऐवजी चार जणांना उमेदवारी दिली तर निवडणूक होईल. भाजपा चार उमेदवारांना उभे करून निवडणुका घेण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे. पण भाजपाचे महाराष्ट्रातील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. यामुळे काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

काँग्रेसने राज्यसभेसाठी जाहीर केलेले उमेदवार

राजस्थानमधून सोनिया गांधी
बिहारमधून डॉ. अखिलेश प्रसाद सिंह
हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनू सिंघवी
महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे

कोण आहेत चंद्रकांत हंडोरे ?

काँग्रेसचे सदस्य, माजी सामाजिक न्यायमंत्री, चेंबूरचे माजी आमदार आणि मविआ राज्यात सत्तेत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष होते चंद्रकांत हंडोरे. ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि गांधी परिवाराच्या विश्वासूंपैकी एक म्हणून ओळखले जातात.

हंडोरेंनी भूषवलेली पदे

१९८५ – १९९२ : नगरसेवकः बृहन्मुंबई महानगरपालिका
१९९२ – १९९३ : अध्यक्ष: महाराष्ट्र महापौर परिषद
१९९२ – १९९३ : मुंबईचे महापौर (रिपाईं)
२००४ – २००९ : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
२००४ – २००९ : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री (काँग्रेस)
२००८ – २००९ : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री
२००९ – २०१४ : महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
२०१४ – २०२१ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष
डिसेंबर २०२० – वर्तमान : मुंबई प्रदेश काँग्रेसचे प्रभारी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस
मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस
०५ फेब्रुवारी २०२१ – आतापर्यंत : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number