‘ज्या जमिनीवर रेष काढाल ती जमीन मंदिरासाठी’

अबुधाबी, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब आमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी संयुक्त अरब आमिरातीत रुपे कार्ड सक्रीय केले. आता भारताचे रूपे कार्ड संयुक्त अरब आमिरातीमध्येही वापरता येईल. लवकरच भारताची ऑनलाइन इन्स्टंट पेमेंट प्रणाली अर्थात यूपीआय फ्रान्स, श्रीलंका आणि मॉरिशस प्रमाणे संयुक्त अरब आमिरातीतही सुरू होणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान […]

‘ज्या जमिनीवर रेष काढाल ती जमीन मंदिरासाठी’

अबुधाबी, १३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब आमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी संयुक्त अरब आमिरातीत रुपे कार्ड सक्रीय केले. आता भारताचे रूपे कार्ड संयुक्त अरब आमिरातीमध्येही वापरता येईल. लवकरच भारताची ऑनलाइन इन्स्टंट पेमेंट प्रणाली अर्थात यूपीआय फ्रान्स, श्रीलंका आणि मॉरिशस प्रमाणे संयुक्त अरब आमिरातीतही सुरू होणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी अबुधाबी येथे ‘अहलान मोदी’ अर्थात मोदींची ललकारी या कार्यक्रमात भारतीयांना संबोधित केले. या कार्यक्रमाला संयुक्त अरब आमिरातीच्या वेगवेगळ्या भागांतून मोठ्या संख्येने भारतीय नागरिक आले होते. भारतातील विविध राज्यांचे आणि धर्माचे नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना भारत आणि संयुक्त अरब आमिराती यांची मैत्री दीर्घकाळ टिकेल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

संयुक्त अरब आमिरातीने स्वच्छेने मंदिरासाठी भूखंड देण्याची तयारी दाखवली. आता या भूखंडावर भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरासाठी जेव्हा जमिनीवर चर्चा सुरू होती त्यावेळी संयुक्त अरब आमिरातीचे राजे मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान म्हणाले की, आपण ज्या जमिनीवर रेष काढाल ती जमीन मंदिरासाठी दिली जाईल. राजे त्यांच्या शब्दाला जागले आहेत. अबुधाबीत भव्य दिव्य मंदिर उभे राहिले आहे. भारत आणि संयुक्त अरब आमिराती यांच्यातील मैत्री उच्च पातळीवर पोहोचली आहे. आता संयुक्त अरब आमिराती हा देश भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. जगातील प्रत्येक मोठ्या व्यासपीठावर भारताचा आवाज ऐकू येत आहे. कुठेही संकट आले तर तिथे पोहोचणाऱ्या पहिल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे; असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदींची गॅरंटी अर्थात दिलेले आश्वासन पूर्ण होण्याची गॅरंटी असल्याचे सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number