महाराष्ट्र काँग्रेसमध्ये घमासान

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा तसेच काँग्रेसमधील सर्व पदांचा सोमवारी राजीनामा दिला. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे. नाना पटोले अनेक काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. अडचणीत आलेल्या नाना पटोले […]

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये घमासान

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा तसेच काँग्रेसमधील सर्व पदांचा सोमवारी राजीनामा दिला. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे. नाना पटोले अनेक काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. अडचणीत आलेल्या नाना पटोले यांना आता अचानक विलासराव यांची आठवण आली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत नाना पटोले यांनी काँग्रेस मजबूत आहे आणि राहील असा दावा केला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाना पटोलेंसोबत मतभेद असलेले नेते

अशोक चव्हाण, बंडखोर
बाळासाहेब थोरात, विधिमंडळ गटनेता
माणिकराव ठाकरे, नेता काँग्रेस
यशोमती ठाकूर, आमदार, काँग्रेस
पृथ्वीराज चव्हाण, आमदार, काँग्रेस
सत्यजीत तांबे, बंडखोर आमदार
सुशीलकुमार शिंदे, नेता काँग्रेस

नाना पटोले यांच्याविरोधात नाराजी असण्यामागची करणे

थेट दिल्लीतून आदेश घेतात.
स्थानिक पातळीवर कुणाशी चर्चा करत नाहीत.
राज्यात नेमणुका मर्जीनुसार करतात.
संघटना बांधणीत नेत्यांचे हितसंबंध जपत नाहीत
राहुल गांधी यांच्याशिवाय कुणालाही जुमानत नाहीत.

नाना पटोले यांच्यासाठी परिस्थिती आव्हानात्मक बनली तर काय होऊ शकते ?

काँग्रेस नाना यांना समज देईल.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नियामक मंडळ बनवलं जाईल.
राज्य काँग्रेसच्या नेत्यांना परस्परांशी सुसंवाद ठेवण्यास सांगितले जाईल.

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचे ट्वीट

अशोक चव्हाण हे पक्षासाठी निश्चितच संपत्ती होते. कोणी त्यांना उत्तरदायित्व म्हणत आहेत. कोणी ईडीला जबाबदार धरत आहेत. ही सर्व उतावीळ प्रतिक्रिया आहे. मुळात महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते. याची माहिती त्यांनी वेळोवेळी वरिष्ठ नेतृत्वाला दिली होती. त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती.

मुंबईत १४ तारखेला सर्व काँग्रेस आमदारांची बैठक
सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी पक्षादेश जारी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number