पंकजा मुंडेंचा सन्मान

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीत राष्ट्रीय पातळीवर संघटनेची एक महत्त्वाची जबाबदारी हाताळत आहेत. पक्षाचा त्यांच्यावर विश्वास आहे यामुळे त्यांच्याकडे एवढी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पंकजा मुंडे यांचा पक्षात सन्मान होता, आहे आणि राहणार; असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत भाजपा कार्यालयातील एका कार्यक्रमात बोलत होते. देवेंद्र फडणवीस […]

पंकजा मुंडेंचा सन्मान

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीत राष्ट्रीय पातळीवर संघटनेची एक महत्त्वाची जबाबदारी हाताळत आहेत. पक्षाचा त्यांच्यावर विश्वास आहे यामुळे त्यांच्याकडे एवढी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पंकजा मुंडे यांचा पक्षात सन्मान होता, आहे आणि राहणार; असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत भाजपा कार्यालयातील एका कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात सोमवारी सकाळी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. वॉर्ड क्र ८२ मध्ये दोन टर्म काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगदीश कुट्टी अमिन आणि वाॉर्ड क्र २१६ चे माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड, भालचंद्र शिरसाट, अमरजीत मिश्र आणि माजी नगरसेवक मुरजी पटेल यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांना पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या संदर्भातला प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांचा पक्षात सन्मान होता, आहे आणि राहणार; असे सांगितले. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आगे आगे देखो होता है क्या.. असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number