चर्चा करणाऱ्यांनी काँग्रेस सोडली, वंचितची व्यथा

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ‘प्रिय काँग्रेस, आम्ही कोणाशी बोलावे ? जे नेते चर्चेसाठी नेमले तेच काँग्रेस सोडून गेले… राधाकृष्ण विखे पाटलांना २०१९ला युतीच्या चर्चेसाठी नेमले, ते भाजपमध्ये गेले. अशोक चव्हाणांना मविआत काँग्रेस प्रतिनिधी म्हणून नेमले. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ते देखील भाजपमध्ये जाणार असं दिसतंय. आता आम्ही युतीबाबत कुणाशी बोलावे ?’; या शब्दात […]

चर्चा करणाऱ्यांनी काँग्रेस सोडली, वंचितची व्यथा

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ‘प्रिय काँग्रेस, आम्ही कोणाशी बोलावे ? जे नेते चर्चेसाठी नेमले तेच काँग्रेस सोडून गेले… राधाकृष्ण विखे पाटलांना २०१९ला युतीच्या चर्चेसाठी नेमले, ते भाजपमध्ये गेले. अशोक चव्हाणांना मविआत काँग्रेस प्रतिनिधी म्हणून नेमले. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ते देखील भाजपमध्ये जाणार असं दिसतंय. आता आम्ही युतीबाबत कुणाशी बोलावे ?’; या शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी पक्षाची व्यथा ट्वीट करून जाहीर केली.

याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी सकाळी आमदारकीचा तसेच काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number