मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात

कोलकाता, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यसभेचे माजी खासदार आणि मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिथुन चक्रवर्ती ७३ वर्षांचे आहेत. अलिकडेच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी ३५० पेक्षा जास्त […]

मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात

कोलकाता, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यसभेचे माजी खासदार आणि मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिथुन चक्रवर्ती ७३ वर्षांचे आहेत. अलिकडेच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमधून काम केले आहे. ‘द ताश्कंद फाईल्स’, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटातील निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी मिथुन चक्रवर्ती यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number