नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसासाठी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील प्रतोद डॉ. लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी पक्षाच्या सर्व खासदारांसाठी तीन ओळींचा पक्षादेश काढला आहे. सर्व भाजपा खासदारांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत हजर राहून सरकारला पाठिंबा द्यावा अशा स्वरुपाचा हा आदेश आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आधी शुक्रवार ९ फेब्रुवारी २०२४ रोजी संपणार होते. पण अधिवेशनाच्या कालावधीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवार १० फेब्रुवारी २०२४ रोजी संपणार होते.
